शेतकरी बांधवांनो आता मधुमक्षिका पालन करून कमवा लाखो रुपये,

 

शेतकरी बांधवांनो आता मधुमक्षिका पालन करून कमवा लाखो रुपये, शासनाच्या या योजने अंतर्गत करा अर्ज | Madhmashi Palan Yojana

शेतकरी बांधवांनो आता मधुमक्षिका पालन करून कमवा लाखो रुपये, शासनाच्या या योजने अंतर्गत करा अर्ज | Madhmashi Palan Yojana

राज्यातील शेतकऱ्यांना मधुमक्षिका पालन करून नवीन व्यवसाय सुरू करता यावा, यासाठी केंद्र व राज्य सरकार वेळोवेळी प्रयत्न करत आहे. केंद्र सरकारने मधुमक्षिका पालनाला चालना देण्यासाठी केंद्र स्तरावर योजना सुरू केलेली असून त्याकरिता शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे व मधुमक्षिका पालन करण्यासाठी अनुदान देणे इत्यादींचा समावेश आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यात देखील शेतकऱ्यांना मधुमक्षिका पालन करता यावे यासाठी राज्य शासनाची नानाजी देशमुख कृषी संजीवनी पोखरा योजना सुरू आहे.

 

मधुमक्षिका पालनासाठी कोणत्या योजनेअंतर्गत लाभ मिळेल? Madhmashi Palan Yojana 2023?

शेतकरी बांधवांना जर तुम्हाला मधुमक्षिका पालन करायचे असेल तर महाराष्ट्र शासनाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजे पोखरा योजनेअंतर्गत अर्ज करता येतो. पोखरा योजना ही राज्यातील 5242 गावांमध्ये राबविण्यात येत असून तर तुमच्या गावाचा समावेश या योजनेमध्ये असेल तर तुम्ही मधुमक्षिका पालन योजना अंतर्गत लाभ मिळवू शकतात.

 

मधुमक्षिका पालन लखपती बनवणारा व्यवसाय!

Madhmashi Palan m हा एक व्यवसाय होत असून जर आपण योग्य पद्धतीने मधुमक्षिका पालन केले तर खूप मोठ्या प्रमाणात या व्यवसायामध्ये पैसे कमावण्याचा संधी आहे. मधुमक्षिका पालनातून मिळणारा मध पॅकिंग करून बाटलीमध्ये भरून विकले तर लाखो रुपये कमावता येतात.

जर तुम्ही हा Madhmashi Palan Yojana Business अतिशय कमी प्रमाणात म्हणजे छोट्या प्रमाणात व्यवसाय सुरू केल्या तरीसुद्धा एका वर्षाला 50 ते 60 हजार रुपये पर्यंतचे मध तुम्ही या व्यवसायातून विकू शकतात. मधुमक्षिका पालनापासून मध माहिती तसेच मेन सुद्धा बनविले जाते.

 

 

मधुमक्षिका पालनासाठी कुणाला लाभ मिळेल?

मधुमक्षिका पालन योजना अंतर्गत प्रकल्प स्थापन करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतो अर्ज केल्यानंतर ग्राम कृषी संजीवनी लाभार्थ्यांची निवड ही भूमिहीन व्यक्ती तसेच अल्प आणि अत्यल्पभूधारक शेतकरी तसेच अनुसूचित जाती व जमातीतील शेतकरी त्याचबरोबर महिला शेतकरी आणि दिव्यांग आणि त्यानंतर सर्वसाधारण या क्रमानुसार लाभार्थ्यांची निवड करते.

 

अर्ज कसा करायचा? How to Apply For Madhumakshika Yojana?

1. जर तुम्ही मधुमक्षिका पालन योजनेअंतर्गत अर्ज करून लाभ मिळवण्यास इच्छुक असाल तर सर्वात पहिल्यांदा महाराष्ट्र शासनाच्या https://dbt.mahapocra.gov.in या पोखरा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा.

2. या ठिकाणी शेतकरी म्हणून नोंदणी करा.

3. आता योजनेअंतर्गत लॉगिन करा या पोर्टलवर लॉगिन केल्यानंतर तुमची शेतकरी म्हणून संपूर्ण माहिती भरा पिकांची माहिती ॲड करा व वैयक्तिक माहिती ॲड करा.

4. आता तुम्हाला ऑनलाईन अर्ज करा या पर्यायांमध्ये जाऊन मधुमक्षिका पालन हा ऑप्शन निवडायचा आहे.

5. तुमच्यासमोर मधमाशी पालन योजनेचा अर्ज ओपन झाल्यानंतर तो व्यवस्थितपणे भरा.

6. शेतकऱ्यांना पूर्वसंमती मिळाल्यानंतर म्हणजेच योजनेअंतर्गत निवड झाल्यानंतर योजनेसंदर्भात इतर आवश्यक बाबींची खरेदी करावी लागेल आणि त्यानंतर ऑनलाईन अनुदान मागणीचा अर्ज करता येतो.

Comments

Popular posts from this blog

*🌾☘️प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2023-24🌿🌱* *फक्त 1रुपयात *